मांडवेदिगरच्या जखमीचा मृत्यू ; आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा

0

भुसावळ- तालुक्यातील मांडवेदिगर येथे 27 रोजी लग्नसोहळ्यात वाद उफाळल्याने अर्जुन शिवा वाघ (30) यांनी भगवान बुधा वाघ यास मारहाण केली होती तर हा राग डोक्यात ठेवून रात्री वाघ यांनी अर्जुन शिवा वाघ यांना बेदम मारहाण केल्याने वाघ यांच्यावर धुळ्याच्या येथे शासकीय हिरे महाविद्यालयात उपचार सुरू होते. 5 रोजी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात संशयीत आरोपी भागवत बुधा वाघ विरुद्ध खुनाचे कलम वाढविण्यात आल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण हजारे यांनी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अटकेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी मंगल शिवा वाघ यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.