मांडवेदिगरला पोलिस पाटलासह दोघांना मारहाण

0

भुसावळ- तालुक्यातील मांडवेदिगर येथील पोलिस पाटलासह त्यांच्या वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मांडवेदिगरचे पोलिस पाटील फिर्यादी रवींद्र भागमल पवार (35) हे 1 रोजी सकाळी 10.30 वाजत बसस्थानकाजवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत असताना संशयीत आरोपी ज्योतमल बद्री पवार याने हा कार्यक्रम बंद करा म्हणून गोंधळ घातला तसेच लोकांना शिवीगाळ करीत असताना तक्रारदाराने रवींद्र पवार यांनी समजून सांगितल्यानंतरही आरोपीने त्यांच्या पायाच्या उजव्या मांडीवर तसेच त्यांचे वडिल भागमल पवार यांनाही उजव्या हातावर मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास नाईक राजेंद्र पवार करीत आहेत.