मांढरदेव घाटात दरड कोसळली

0

आंबाडे घाटात मोठ्या वाहनांसाठी प्रवेश बंद

भोर । भोरजवळ मांढरदेव घाटात रविवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून मोठ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, येथून जाणार्‍या एसटी चालक-वाहक व प्रवाशांनी मिळून रस्त्यावरील दगड बाजूला सारून थोडासा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे लहान गाड्यांना वाहतूक करता येत आहे. मात्र, संपूर्ण रस्ता अजूनही मोकळा न झाल्याने मोठ्या गाड्या अडकल्या आहेत. घाटात अजूनही काही ठिकाणी दरड कोसळत आहेत.