चाळीसगाव : तालुक्यातील मांदुर्णे येथे बकर्यांचा चारा काढण्यासाठी शेतात गेेलेल्या 25 वर्षीय तरुणाचा झाडातून गेलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होवून शॉक लागून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पिलखोड येथील महावितरण कंपनीचे अभियंता व वायरमन यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शॉक लागल्याने झाला तरुणाचा मृत्यू
मांदुुर्णे येथील नितीन बळवंत नामेकर याचा 17 रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास गणेश देसले यांच्या शेतात बकर्यांना चारा काढण्यासाठी गेला असता पाटचारीत विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून महावितरणचे पिलखोड येथील इंजिनिअर व वायरमन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने महावितरणच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.