कल्याण : गुरुवारी पहाटे आसनगाव आट गाव रेल्वे स्थानकादरम्यान एका महिलेसह दोन मुलींचे मृतदेह आढळले होते .या तिघींची ओळख पटली असून महिलेचे नाव राधा मदगे ,प्रिया 5 ,अक्का 3अशी मुलींची नावे आहेत .राधाला दोन्ही मुली झाल्याने तिच्या पतिने तिचा छळ सुरू केला या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप राधाच्या वडिलांनी केला आहे
गुरुवारी पहाटेच्या सुमारास आसनगाव आटगाव दरम्यान देवगिरी एक्स्प्रेस मुंबई दिशेकडे रवाना झाल्यानंतर रेल्वे ट्रक वर एका महिलेसह दोन चिमुकल्या मुलीचे मृतदेह पडलेले आढळले होते .या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत हे तीनहि मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. यातील महिला सुमारे ३५ वर्षे वयाची असून एक ५ वर्षाची तर एक ४ वर्षाची अशा दोन मुली असल्यामुळे आईने आपल्या चिमुकल्या मुलीसांह आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त करत पुढील तपास सुरू केआहे. अखेर या महिलेची आणि दोन मुलींची ओळख पटली असून आईचे नाव राधा मदगे ,प्रिया 5 ,अक्का 3अशी मुलींची नावे आहेत .मयत राधाशहापूर तालुक्यातील शिवांजली गावात आपल्या पतीसह राहत होत्या राधाला दोन्ही मुली झाल्याने पती गणेश आणि त्याचे कुटुंब राधाचा करत होते छळ ,पती चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्रस्त राधाने आत्महत्या केल्याचा आरोप राधाच्या वडिलांनी केला असून या प्रकरणी त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दिला आहे .याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर पिंगळे यांना विचारले असता त्यांनी राधाच्या वडिलांनी तिच्या आत्महत्येस तिचा पती गणेश जबाबदार असल्याचा आरोप करत तसा तक्रार अर्ज दिला असून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत तर सदरचा तक्रार अर्ज चौकशी साठी शहापूर पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याचे सांगितले.