माओवाद्यांचा मोदींची हत्या करून सरकार उलथवण्याचा होता प्रयत्न

0

मुंबई-हजारो कागदपत्रे पाच माओवाद्यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात ताब्यात घेण्यात आली असून फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. माओवाद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करून सरकार उलथवण्याचा कट होता असा दावा पोलिसांनी केला आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक परमवीर सिंग यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि पाचही माओवाद्यांवर केलेली कारवाई अत्यंत योग्य असून मोठ्या षडयंत्राचा पर्दाफार्श केल्याचा दावा त्यांनी केला.

वरावर राव, अरूण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा व वर्नन गोन्साल्विस यांना झालेल्या अटका अत्यंत योग्य होत्या परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरून त्यांना स्थानबद्धतेत ठेवल्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. देशभरात नऊ ठिकाणी छापे घालण्यात आले, हजारो कागदपत्रे, कम्प्युटर्स व लॅपटॉप त्यांच्या पासवर्डसह ताब्यात घेण्यात आले आहे.

नक्षलींशी असलेल्या संबंधांवरुन 29 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरात नऊ ठिकाणी छापे मारले होते. सर्व छाप्यांचे व्हिडीओ शूटींग केल्याचे पोलिसांनी सांगितले.