तळेगाव दाभाडे । मावळातील सोमाटणे फाटा येथील पायोनियर हॉस्पिटलच्या आवारात एक माकड गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालत आहे. त्याच्या त्रासामुळे हॉस्पिटलमधील कर्मचारी व रुग्णाचे नातेवाईक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून ते या परिसरातच वावरत आहे.
नागरिकांवर धावून जात असल्याने रुग्ण, त्यांचे नातेवाईक, कर्मचारी व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्या संबंधी पायोनियर हॉस्पिटलचे सीईओ गणेश नांदेडकर यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना या माकडाचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदनाद्वारे विनंती केली आहे.