कोलकाता-माकपाचे ज्येष्ठ नेते तथा पश्चिम बंगालचे माजी मंत्री निरूपम सेन यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. रुग्णालयात उपचार घेत असतांना त्यांचे निधन झाले.
उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पक्षाच्या मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.