जळगाव। साधारण जुन महिन्यात पेरणी करण्यात येत असते. त्याअनुषंगाने मे महिन्यापासूनच शेती कामास सुरुवात झाले आहे. खरीब शेती हंगामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने बि-बियाण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी कृषी विभागातर्फे 23 लाख कापुस बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली होती. कंपन्याकडून मात्र दोन लाख अधिक कापुस बियाणे पाकिटे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
25 लाख बियाण्याची पाकिटे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांना कापुस बियाण्यांची कमतरता भासू नये यासाठी अधिक बियाणे पुरविले जाणार आहे. राज्यातील 43 मोठ्या कंपन्या बियाणे पुरवठा करणार आहे. तसेच लहान कंपन्यांना देखील बियाणे उपलब्ध करुन देण्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात येणार आहे. 15 मे पर्यत सर्व बियाणे उपलब्ध होणार आहे.