शहापूर । शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या महावितरण तसेच आदिवासी विकास महामंडळाकडून समस्या सोडवण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे यांनी संबंधित अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. तालुक्यात महावितरणच्या समस्यामध्ये विजेचा लपंडाव, पोल व विजेच्या तारा बदलणे, वीज ग्राहकांना त्वरित मीटर देणे, मीटर रीडिंग व वीज बिल वेळेवर देऊन अव्वाच्या सव्वा वीज बिल कर्मचारी यूनिफॉर्मवर नसणे या मागण्याचे निवेदन उपअभियंता कटकवार यांची भेट घेऊन देण्यात आले.
निवेदनात विविध मागण्या
आदिवासी विकास महामंडळमध्ये बविआचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे यांनी अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी शहापूर तालुक्यात भात खरेदी केंद्र त्वरित सुरू करणे ,शेतकर्यांच्या भाताला 2000 ते 2500 हमी भाव देणे, शेतकर्यांना बारदान वेळेवर उपलब्ध करून देणे, गोडाऊन मालकाचे थकीत भाडे त्वरीत देणे, या मागण्या करण्यात आल्या आहेत. बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष योगेश हजारे यांनी संबंधित अधिकार्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.