मागण्यांबाबत विचार न केल्यास जूनपासून राज्यभरातील शाळा बंद करण्याचा इशारा

0

जळगाव । 2008 पूर्वीच्याच शाळांना वेतनेत्तर अनुदान देण्याची अट घालण्यात आली आहे. ही अट शिथील करण्यात येऊन 2008 नंतरच्या शाळांना देखील वेतनेत्तर अनुदान लागू करावे, शिक्षकांना अ‍ॅप्रोव्हल देण्याचे 2012 पासून बंद करण्यात आले आहे असून शिक्षकांना लवकर अ‍ॅप्रोव्हल देण्यात यावे, नवीन महाराष्ट्र शिक्षण कायदा लवकर पारीत करण्यात यावा आदी मागणी राज्य शिक्षण संस्था महामंडळाने केली असून मागण्या मान्य न झाल्यास जून पासून शाळा बंद करण्याचा इशारा अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. नूतन मराठा महाविद्यालयात माजीमंत्री विजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासोबत मराठा विद्याप्रसारक मंडळाचे संचालक किरण साळूंखे उपस्थित होते.

त्रासदायक जीआर
आताच्या सरकारने दररोज नवनवीन शासन अध्यादेश (जीआर) काढण्याचे काम सुरु केले असून एकमेकांशी विसंगत असे 520 जीआर एका शैक्षणिक वर्षात काढले आहे. जीआर काढण्याची बघीतली असता दररोज 2 पेक्षा अधिक जीआर काढण्यात येत आहे. हे अध्यादेश अमलात आणतांना शिक्षण संस्था चालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनाच नाही तर शिक्षणाधिकारी यांना देखल त्रासदायक ठरत असल्याचे आरोप माजीमंत्री विजय पाटील यांनी केले.

सुसूत्रता येईल
केंद्र सरकारने मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा पास केला. त्याला संयुक्तीत असा म्हणजे मिळता जुळता व राज्यातील स्थानिक परिस्थितीला धरुड धोडा वेगळा कायदा पारीत करण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. परंतू तत्कालीन शिक्षण सचिव सहारीया यांनी ही समिती बरखास्त केली. त्यामुळे कायद्यातील तरतुदीचा संबंध साधून शैक्षणिक धोरण व्यवस्थित आखता आले नसल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण कायदा लागू केल्यास शिक्षण क्षेत्रात सुसूत्रता येईल असेही त्यांनी सांगितले.

जबाबदार शिक्षणमंत्री असावा
सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शैक्षणिक क्षेत्राबाबत कोणतेही ज्ञान नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील गोंधळ अधिक वाढले आहे. शिक्षणमंत्री हा जबाबदार व तज्ज्ञ असावा, तो कोणत्याही पक्षाचा असो असे विजय पाटील यांनी सांगितले. शाळा बंद करु नका, शिक्षणाचे व्यापारीकरण थांबवा, ज्या शाळा बंद करण्यात येत असून त्या चालविण्यासाठी खाजगी शिक्षण संस्थेला देण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. आरएसएस व कॉग्रेसचा चष्मा सरकार वापरत असल्याचे आरोपही पाटील यांनी केले.