फैजपूर। उत्तर महाराष्ट्र मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2006 नुसार विद्यापीठ व्यवस्थापन अधिसभा, अभ्यास मंडळ व विविध समित्यांवर मागासवर्गीय संघटनेच्या सभासदांना नामनिर्देशित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागण्यांचा आहे समावेश
व्याख्याता भरती केेंद्रीय निवड समितीद्वारे करण्यात यावी, मागासवर्गीयांचा संपूर्ण अनुशेष भरण्यात यावा, कॅस चे आयोजन विद्यापीठात करावे, पीएच.डी. प्रवेश पात्रता परिक्षा वर्षातून दोन वेळा घ्यावी, प्रवेश व परिक्षा शुल्कात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलत मिळावी, कमवा व शिका योजनेेंतर्गत विद्यार्थी संख्या महाविद्यालयीन स्तरावर वाढवून देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश आहे. संघटनेेच्या वतीने अध्यक्ष प्रा. बी.ए. संदानशिव, धुळे जिल्हाध्यक्ष प्रा. मधुसुदन अमृतसागर, प्रा. डी.आर. तायडे यांनी कुलगुरुंना निवेदन दिले. याप्रसंगी ज्येेष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे, डॉ. मिलिंद बागुल, प्रा. महेेंद्र वाढे, प्रा.डॉ. वसंतराव पवार, प्रा. आर.पी. नगराळे, प्रा. पुरुषोत्तम मोरे, डॉ. सुरेश आगळे, प्रा. के.के. अहिरे, प्रा.डॉ. प्रदिप सुरळकर, प्रा. जे.जी. खरात, प्रा.डॉ. शरद बिर्हाडे, डॉ. जे.जी. मगर, प्रा. प्रमोद तायडे, प्रा. विनय कांबळे, प्रा. डी.वाय. हिवरे, प्रा. एम.डी. खैरनार, प्रा. गौतम थोरात आदी उपस्थित होते.