मागासवर्गीय पदोन्नतीचे विधेयक लवकरच संसदेत

0

नवी दिल्ली । दलित आदिवासी विद्यार्थ्यांना महागाई निर्देशांकाप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी आणि दलित आदिवासींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे याबाबतचे विधेयक त्वरित संसदेत मांडून ते मंजूर करावे या महत्वपूर्ण मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी संसदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी यांनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे आठवले यांनी सांगितले.

बर्‍याच वर्षांपासून हे विधेयक प्रलंबीत असून त्यामुळे हजारो कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या बढत्या रखडल्या आहेत, म्हमूनच आपण पंतप्रधांनाकडे आग्रहं धरल्याचे आठवले यांनी सांगितले. दलित-आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तईमध्ये गेल्या अनेक वर्षात कसलीही वाढ झालेली नाही. त्यात तात्काळ बदल होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. मुळात विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत असल्याच्याही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे ते म्हणाले. दरम्यान भीम ऍप आणि चलनी नोटांवर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असावा या मागणीचा प्रधान्याने पाठपुरावा करीत असून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्याविषयी आठवलेंनी बैठकीत आग्रहं धरला आहे.