भुसावळ। दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या बेरोजगारांनी स्वयंरोजगारासाठी मागासवर्गीय आर्थिक महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाकडून घेतलेले कर्ज माफ व्हावे यासाठी रिपाइं राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मंगळवार 25 रोजी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, खान्देश प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र खरात, उत्तर महाराष्ट्र सचिव रविंद्र तायडे, मनोज अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका युवा अध्यक्ष पप्पू सुरडकर, विश्वास खरात, सुनिल अंभोरे, नरेंद्र अव्हाड, अनिल इंगळे, भगवान निरभवणे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. यशस्वीतेसाठी भिमराव वाघ, अशोक तायडे, शांताराम देशमुख, दादा निकम, आनंद तायडे, आकाश ढिवरे, गोरख सुरवाडे, प्रकाश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.