जळगाव । वरणगांव येथील मागासवर्गीय महिलांना बचत गटाचे जिवनाश्यक विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले़ या बचत गटात गरिब महिला असून आर्थिक व सामाजिक विकासासाठी, रोजंदारी व व्यवसायासाठी अडचणी येत आहे़ दारिद्रय रेषेचे कार्ड, ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आर्थिक सहाय्यतासाठी, बँकेमार्फत व्यवसायासाठी कर्ज मिळावे, विविध व्यवसायांचे प्रशिक्षण, विविध योजनांसाठी, पंतप्रधान आवास योजनांसाठी, घरेलु कामगार व बांधकाम मजुरांसाठी कामगार योजना आदी मागण्यासाठी निवेदन दिले आहे़