नंदुरबार । नंदुरबार शहरापासून अडीच किलोमीटर अंतरावर होळतर्फे हवेली येथे टेकडीवर मागासवर्गीय विद्यार्थीनींसाठी वसतीगृह योजना सुरु करण्यात आली आहे. अनु.जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्गीय विद्यार्थीनींना गुणवत्तेनुसार व रिक्त जागानुसार इयत्ता आठवीते उच्च शिक्षणापर्यंत प्रवेश देण्यात येतो. विद्यार्थीनींना पोटभर जेवण, दररोज सकाळी दूध, नाश्ता, दोन अंडी, शाकाहारीसाठी कॉर्नफ्लेक्स, 1 सफरचंद, ऋतुमानानुसार फळ, जेवणात पोळ्या, वरणभात, भाजी, मटन, चिकन, आठवड्यातून दोनदा, शाकाहारीसाठी गोड पदार्थ, कांदे, लिंबू, लोणचे, पापड, सलाड, तूप दिले जाते. याशिवाय दरमहा निर्वाह भत्ता सहाशे रुपये, शालेय विद्यार्थीनींना गणवेशासाठी एक हजार रुपये तसेच ड्रेसकोड सक्तीचा असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनींना दोन हजार रुपये, छत्री, रेनकोट व गमबूटसाठी प्रतिवर्षी पाचशे रुपये, शैक्षणिक सहलीसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये, प्रोजेक्ट रिपोर्टसाठी एक हजार रुपये. स्पर्धा परीक्षा पुस्तके उपलब्ध आहेत. स्वतंत्र संगणक कक्ष असून इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. राजेंद्र कलाल (प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, नाशिक) व राकेश महाजन (सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार) यांचे मार्गदर्शन लाभत आहे.