मागील कामगिरीतील सातत्य राखू

0

नवी दिल्ली । मागील तीन वर्षांच्या कालावधीत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघ आता नंबर वन आहे. श्रीलंकेच्या दौर्‍यातही अशीच सातत्यपूर्न कामगिरी करू, असा विश्‍वास श्रीलंकेच्या दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केला, तर शास्त्री यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्व श्रेय याआधीच्या प्रशिक्षकांना दिले. शास्त्री म्हणाले की गेल्या तीन वर्षांमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीचा चढता आलेख राहिला आहे. मागील प्रशिक्षकांना त्यासाठी धन्यवाद द्यायला पाहिजे. तीन वर्षापूर्वी मी जिथे सोडून गेलो होतो तिथूनच पुन्हा नवी सुरुवात करणार आहे. असे शास्त्रींनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. भारतीय संघ 21 आणि 23 जुलैला सराव सामने खेळणार आहे. त्यानंतर 26 जुलै ते 16 ऑगस्टपर्यत तीन कसोटी सामने होतील.

मैदानात धावा करण्याचे काम
यावेळी विराट कोहलीने सांगितले की, मैदानात जाऊन धावा करणे हे त्याचे काम आहे. मैदानावर राहून नियंत्रण राखता येईल अशा गोष्टींवरच लक्ष केंद्रित करतो. संघव्यवस्थापनाशी चर्चा करून माझ्या खेळाचा संघाला फायदा कसा होईल यासाठी माझे प्रयत्न असतात. कसोटी मालिकेनंतर 20 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरपर्यत पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येईल. दौर्‍यातील एकमेव टी-20 सामना 6 सप्टेंबर रोजी होईल.