नवी दिल्ली-रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत मागील तीन वर्षात २२१ रेल्वे अपघात झाले त्यात ३२४ जणांचा मृत्यू तर ६२८ जण जखमी झाल्याची माहिती दिली. मनसुखभाई धनजीभाई वसावा आणि भरत सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी ही आकडेवारी दिली.
२०१६-१७ मध्ये १०४ अपघात त्यात २३८ जणांचा मृत्यू तर ३६९ जण जखमी झाले होते. २०१७-१८ मध्ये ७३ अपघातात ५७ जणांचा मृत्यू तर १९७ जण जखमी झाले आहे. २०१८-१९ (३० नोव्हेंबर) पर्यंत ४४ अपघातात २९ जणांचा मृत्यू तर ६२ जण जखमी झाले आहे.