बीड। शेतकरी माल विक्रीसाठी आल्यावर त्याला एका वेळेचे जेवणासाठी 100 रूपये मोजावे लागतात. यावेळी शेतकर्यांच्या जेवणाचे हाल होतात. यावर उपाय म्हणून माजलगाव बाजार समितीने एक रुपयात जेवण हा उपक्रम राबवला.मात्र बीडमध्ये एका रूपयात जेवण दिले जात आहे. हे भरपेट स्वस्त जेवण फक्त शेतकर्यासाठीच आहे.
या जेवणात भाजी, चपाती, भात, वरण यांसोबत पापड आणि पिण्यासाठी फिल्टरचे पाणी हे सगळे केवळ एक रुपयात मिळत आहे. माजलगाव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर ही बाजार समिती आहे. त्यामुळे सकाळी आपला माल घेऊन आलेल्या शेतकर्याला आपल्या शेतीमालाची विक्री करण्यासाठी दुपार होतेच. त्यातच जवळ जेवणासाठी कोणतेही हॉटेल नाही म्हणून शेतकर्यासाठी एक रुपयात जेवल मिळू लागल्याने स्वस्तात एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला. हे जेवण करण्यासाठी मात्र शेतकर्याला मालाची पोचपावती दाखवणे बंधनकारक आहे.