माजी आमदारांची प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची शिवसेना मेळाव्यात माहितीसातपुड्याच्या कुशीत एक्सप्रेक्स कॅनल देखील प्रस्तावित  

   भुसावळ प्रतिनिधी दि 26

गेल्या २५ वर्षांपासुन सातपुड्याच्या कुशीत लगडा आंबा च्या पुढे असलेल्या हंड्या कुंड्या येथे धरणाची निर्मिती रेंगाळली होती मात्र, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी पाठपुरावा करीत या धरणा करीता तब्बल ६० कोटी रूपयांचा निधी मिळवला असुन केंद्राच्या वनविभागास १३ कोटी २१ लाख रूपये फी भरून सातपुड्यात धरण निर्माण करण्या करीताची परवानगी मिळवली आहे तेव्हा दिवाळी नंतर १०० टक्के या कामाचे भुमीपुजन होईल अशी माहिती माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली ते यावल येथील शिवसेना कार्यकर्त्या यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व पक्ष संघटन वाढवण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काम करावे, पक्षाचे ध्येय धोरण व विकास कामांची माहिती नागरीकांना द्यावी असे सांगीतले त्याचं प्रमाणे यावल, रावेर व चोपडा तालुक्याच्या भुजल गर्भाच्या पाण्याच्या पातळीत वाढ करण्याच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प हंड्या कुंड्या हा गेल्या २५ वर्षां पासुन रेंगाळला होता त्या प्रकल्पाकरीता राज्य सरकारने या अधिवेशनात ६० कोटीचा निधी मंजुर केला आहे व विशेष बाब म्हणजे चोपडा आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या कडे अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस बाकी असतांना सातपुड्यात धरण निर्मिती करीता परवनगी साठी आवश्यक १३ कोटी २१ लाख रुपये तात्काळ मिळावे म्हणुन विनंती केली व सदरील निधी हा राज्य सरकारने ते उपलब्ध केले व केंद्राच्या वनविभागाची धरणा करीता परवानगी मिळाली आहे व आता दिवाळी पर्यंत १०० टक्के या धरणाच्या कामाचे भुमीपुजन होईल असे माजी आमदार प्रा. सोनवणे यांनी सांगीतले या प्रसंगी जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष सोळुंके, बाजार समितीचे उपसभापती बबलु कोळी, संचालक सुर्यभान पाटील सर, युवासेनेचे तालुका प्रमुख गोटू सोनवणे, मनुदेवी संस्थान अध्यक्ष शांताराम पाटील, भरत चौधरी सह मोठ्या संख्येत शिंदे गट शिवसैनिकांची उपस्थिती होती. तीन तालुक्यांना होणार फायदा.सातपुड्याच्या कुशीत लगडा आंबाच्या पुढे हंड्या कुंड्या आहे. येथील धरण निर्मिती मुळे यावल, रावेर व चोपडा तालुक्यातील ८०० हेक्टर क्षेत्राला फायदा होईल व भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल.

तापी विकास महामंडळा मार्फत निधी वर्ग. अधिवेशनात ६० कोटी रूपये धरणाच्या कामाकरीता मंजुर झाले मात्र, अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असतांना फॉरेस्टची परवानगी साठीच्या निधीचा विषय समोर आला व तापी विकास महामंडळाकडे पैसे नाहीत असे समजले तेव्हा चोपडा आमदार सौ. लताताई सोनवणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातळीने जावुन १३ कोटी २१ लाख रुपये धरणाच्या परवानगी करीता हवे असे सांगीतले व मुख्यमंत्र्यांनी क्षणाचा ही विचार न करता १३ कोटी २१ लाख रुपये तापी विकास महामंडळाकडे जमा केल्याने त्यांनी फॉरेस्ट अदा करून केंद्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची परवानगी मिळवली. सातपुड्याच्या कुशीत एक्सप्रेक्स कॅनल देखील प्रस्तावित मध्यप्रदेशातील तापी नदीतुन मोठ्या प्रमाणावर पाणी उचल करणारी एक्सप्रेक्स कॅनल योजना देखील राज्य सरकार कडे प्रस्तावित करण्यात आली आहे व सुमारे ६०० कोटीचा त्याचा डीपीआर असुन त्यातून रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या कुशील कॅनाल व्दारे भुगर्भाच्या पाण्याच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न राहिल असे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सांगीतले