माजी आमदार कदमबांडे यांचा निवेदन देण्याचा हेतू तपासा

0

धुळे । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पोलीस अधिक्षकांना भेटून आ.अनिल गोटे यांच्यापासून मनोज मोरे यांच्या जिवीतास धोका असल्याचे निवेदन दिले होते. या निवेदन देण्यामागचा हेतू तपासला जावा, अशी मागणी करत आज लोकसंग्रामच्या पदाधिकार्‍यांसह तेजस गोटे यांनी पोलीस अधिक्षकांची भेट घेतली. यावेळी सविस्तर निवेदनही देण्यात आले. आ. गोटे आणि मनोज मोरे यांच्यातील राजकीय आरोप- प्रत्यारोप व पत्रक युध्दाच्या पार्श्‍वभूमीवर आज लोकसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह आ. गोटे यांचे पुत्र तेजस गोटे यांनी पोलीस अधिक्षक एम. रामकुमार यांची भेट घेत, हे निवेदन दिले. सदर निवेदनात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे आणि शहराध्यक्ष मनोज मोरे यांची पार्श्‍वभूमी मांडली आहे.

मोरेंना संपवून आ. गोटेंवर आरोप ठेवण्याचा कट
निवेदन दिल्यानंतर तेजस गोटे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचा पोलीस अधिक्षकांना भेटून आ. गोटे यांच्या विरूद्ध तक्रार करण्याचा हेतु तपासणे आवश्यक असल्याचे आम्ही आज पोलीस अधिक्षकांना विनंती केली आहे. कदाचित कदमबांडे हे मनोज मोरे यांना संपवून त्याचा आरोप आ. गोटेंवर टाकू शकतात, असा युक्तीवाद तेजस गोटे यांनी यावेळी बोलतांना केला. कदमबांडे यांच्या कथीत पार्श्‍वभूमीचा उल्लेख करीत पोलीस अधिक्षकांनी त्यांचा हेतु (मोटीव्ह) तपासावा, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

निवेदनावर यांच्या स्वाक्षर्‍या
सदर निवेदनावर तेजस गोटे, दिलीप साळुंखे, प्रशांत भदाणे, अमोल सुर्यवंशी, संजय बगदे, डॉ. अनिल पाटील, दिपक जाधव, मनोज वाल्हे, जावेदभाई किराणावाले, प्रकाश महानोर, छोटू गवळी, मयुर खैरनार, सचिन सुर्यवंशी, योगेश शिंपी, भोला गोसावी, नाना पाठक, भैय्या बच्छाव, खलीलभाई, नंदु भामरे, गोकुळ पाटील, सिध्दार्थ अहिरे, सचिन कोतेकर, संजय ठाकरे, सुनिल चौधरी, सोमनाथ चौधरी, विजय भोपे, नरेश सोनार, जगदीश भदाणे, शकीलभाई, विशाल चित्ते, रणजित बच्छाव आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.