माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचा सन्मान

0

तळेगाव दाभाडे : माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचा वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून सन्मान करण्यात आला. अनेक संस्थांनीदेखील अनेक सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्यवर पदाधिकारी व प्रमुखांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्याची प्रथा आहे. ˆमाजी आमदार असलेले ˆकृष्णराव भेगडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार भेगडे यांचा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पक्षनेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, ज्येष्ठ नगरसेवक गणेश भेगडे, नगरसेवक सचिन टकले, माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे यांच्यासह नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक, मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, तळेगावातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.