माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

0

भोसरी : माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त बालेवाडी कॅम्पस, येरवडा कॅम्पस, वाघोली कॅम्पसमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

रक्तदान शिबीराचे उदघाट्न एका रक्तदात्या मुलीच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अभिजीत औटी यांनी प्रस्तावनेने केली. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत रक्तदान सुरू ठेवण्यात आले होते.

या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षिका, शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी शिबीरात सहभाग घेतला.ओम ब्लड बँक यांच्या साह्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या शिबीरात ४०० हून अधिक व्यक्तींनी रक्तदान केले. सहभागी व्यक्तींना टी – शर्ट व १२५ रुपयांचा चेक संस्थेतर्फे देण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन ज्ञानेश्वर मोझे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता रत्नराजाकुमार जांभो यांनी केली.