भुसावळातील सर्व बेकायदा सभा रद्दची मागणी ; मागण्यांच्या पूतर्तनंतर उपोषण सोडणार -संतोष चौधरी
जळगाव- भुसावळातील भाजपाच्या सत्ताधार्यांच्या काळात अवघ्या दोन ते पाच मिनिटात झालेल्या सर्व बेकायदा सभा व विशेष सभा रद्द कराव्यात, अमृत योजनेची चौकशी करावी, गोरगरीबांना घरकुलांचे वाटप करावे, शहराती नाल्यांची स्वच्छता करावी, अण्णाभाऊ साठे महामंडळ व महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाची चौकशी करावी, भुसावळ पालिकेला मिळालेल्या खोट्या पुरस्काराची चौकशी करावी यासह अन्य विविध मागण्यांसाठी माजी आमदार संतोष चौधरी यांच्यासह जनाधारचे नगरसेवक शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार चौधरी यांनी व्यक्त केला.
अशा आहेत मागण्या
सत्ताधार्यांच्या काळात झालेल्या सर्व सभा दोन ते पाच मिनिटात आटोपल्याने त्या व अन्य विशेष सभा रद्द कराव्यात, अमृत योजनेची कामे शहरात निकृष्ट पद्धत्तीने सुरू असून गटारींची शहरात कुठलीही व्यवस्था न करता पाईप लाईन टाकली जात आहे, पालिकेने 30 टक्के हिस्सा भरणे क्रमप्राप्त असताना पूर्तता करण्यात आली नसल्याने या योजनेची चौकशी करावी, रेल्वे जागेवरील अतिक्रमितांना पालिकेच्या घरकुलांचा लाभ द्यावा, शहरात गेल्या काही वर्षांपासून नालेसफाई झालेली नाही, ती तत्काळ सुरू व्हावी, गतवर्षी सर्वाधिक कमी दाची निविदा ईगल फाऊंडेशननला मिळाली होती मात्र त्यांना काम देण्यात आले नाही, त्यांनाच काम देण्यात यावे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या पैशांची ईडी मार्फत चौकशी करावी तसेच 2011-2018 या काळात अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ व महात्मा फुले मागासवर्गीय मंडळात मोठ्या प्रमाणात बोगस कर्ज वाटप झाल्याने या प्रकाराची सीआयड अथवा आर्थिक गुन्हे शाखेतर्फे चौकशी करावी आदी मागण्यांसाठी आमरण उपोषण छेडण्यात आले आहे.
यांचा उपोषणात सहभाग
माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणात जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, कामगार नेते जगन सोनवणे, नगरसेवक नितीन धांडे, अॅड.तुषार पाटील, सचिन पाटील, अशोक चौधरी, रवी सपकाळे, दुर्गेश ठाकूर, राहुल बोरसे, प्रदीप देशमुख, सिकंदर खान, सोपान भारंबे, निखील भालेराव, इम्तियाज शेख आदी सहभागी झाले आहेत.
राष्ट्रवादीने दिला उपोषणाला पाठिंबा
जनआधारच्या उपोषणाला राष्ट्रवादीचे जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील, पणन महासंघाचे रवींद्र भैय्या पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, ललित बागुल, रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर, उज्वल पाटील, गोरख वाणी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला. भुसावळ शहराच्या विकासासाठी व चुकीच्या बाबींना विरोध करण्यासाठी जो लढा सुरू आहे त्यास राष्ट्रवादीचा नेहमीच पाठिंबा राहणार असल्याचे पदाधिकार्यांनी प्रसंगी सांगितले.