माजी आमदार साहेबराव पाटील यांच्याकडून नपा कर्मचार्‍यांना मास्क वाटप

0

अमळनेर – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना आजाराबाबत विविध उपाययोजनांबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने उपाययोजना म्हणून अमळनेर येथील नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी स्व खर्चाने सोमवारी मास्क वाटप केले आहे. नगरपालिका म्हटले म्ळणजे याठिकाणी अनेक जण विविध कामांसाठी गर्दी करत असतात, त्यातून कर्मचार्‍यांनी काळजी घ्यावी, दक्षता तसेच खबरदारी म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना मास्क वाटप केले. यावेळी त्यांनी नागरिकांनी हस्तांदोलन टाळावे, दुरुन हात जोडून नमस्कार करावा, प्रत्येकाने आवर्जून मास्क वापरावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन नागरिकांना केले आहे.