माजी आ. साहेबराव पाटलांकडून ६५ कुटूंब दत्तक

0

अमळनेर प्रतिनिधी : येथील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी लॉकडाऊनच्या काळात ६५ कुटूंबांना दत्तक घेऊन मदतीचा हात पुढे केला आहे. पिंपळे रोड शांतीनगर येथील आदीवासी वस्तीतील ६५ कुटुंबांना दैनंदिन गरजेचे अत्यावश्यक सामान – ५ क्विटल गहू, १ क्विटल बटाटे, १ क्विटल वांगी, १ क्विटल कोबी, ५० किलो हिरवी मिरची, ६५ किलो तेल, ६५ किलो मीठ, ३५ किलो मिरची पावडर, २० किलो मसाला पावडर, ५ किलो हळद जीरे मोहरी, १५० मास्क आणि विप्रो तर्फे २८० संतुर साबण असे एकुण रक्कम रुपये ५० हजार किंमतीच्या मालाची समप्रमाणात वाटप करण्यात आले. सोशल डीस्टंन्सींगचे पालन व्हावे म्हणून स्वत:चे घरात कुटुंबासह स्वत:चे अन्न घरातच राहून तयार करणे कामी प्रोत्साहनात्मक अभिनव प्रयोग राबविण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, नगरसेवक विवेक पाटील, अ‍ॅड यज्ञेश्वर पाटील, नगरसेवक घनश्याम पाटील, विक्रांत पाटील, दिपक चव्हाण, अभिषेक ढमाळ,आधार बहुद्देशिय संस्थेच्या चेअरमन भारती पाटील, जयश्री ठाकरे, अश्विनी सुर्यवंशी,वैशाली शिंगाने कलीम खान, तौसिफ खान, किरण भिल, सुरेश भिल, नामदेव भिल उपस्थित होते.