जळगाव। जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेच्या पदाधिकारी व कर्जदारां विरूध्द जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याबाबत माजी आ.सुरेश जैन यांनी अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला असून 19 रोजी न्या.ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात कामकाज होणार आहे.
सुरेशदादा जैन पतसंस्थेत कर्जदार व संचालक यांच्या विरूध्द लेखापरिक्षक दिपक अट्रावलकर यांच्या अहवालावरून 35 जणां विरूध्द 29 जुलै 2016 ला जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात माजी आ.सुरेश जैन यांचा समावेश आहे. सुरेश जैन यांनी घेतलेले कर्जाची परतफेड केलीआहे. तरी त्यांनी अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.