माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

0

मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. मुंबईच्या जसलोक रुग्णालयात वाडेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी वाडेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता असल्याची, माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

अजित वाडेकर यांची मुलगी सिंगापूरला तर मुलगा अमेरिकेत असल्याने अंत्यसंस्कार उशीरा होणार आहे. वाडेकरांच्या निधनानंतर भारतातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.