माजी खासदाराचा प्रवास; भाजपातून कॉंग्रेसमध्ये आता कॉंग्रेसलाही रामराम, काढणार स्वत:चा पक्ष !

0

नवी दिल्ली: बहुचर्चित भाजपचे माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी मागील वर्षी भाजपला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी कॉंग्रेसलाही रामराम ठोकला असून कॉंग्रेसचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकत आता त्यांनी स्वत:चा नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपच्या ध्येय धोरणाने कंटाळून त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता, मात्र आता कॉंग्रेसमध्ये माझे मत ऐकून घेतले जात नसल्याने नाराज होऊन मी कॉंग्रेस सोडत असल्याचे माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी सांगितले आहे.