माजी खासदाराला जन्मठेप

0

रांची। आमदार अशोक सिंह यांच्या हत्येप्रकरणी राजदचे माजी खासदार आणि बाहुबली नेते प्रभुनाथ सिंह यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हजारीबाग न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय दिला.

आमदार अशोक सिंह यांची त्यांच्या पाटणा येथील राहत्या घरी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी प्रभुनाथ सिंह यांच्यासह आणखी दोघांना आरोपी ठरविण्यात आले होते. 18 मे रोजी झालेल्या सुनावणीत हजारीबाग कोर्टाने प्रभुनाथ सिंहसह अन्य तिघांना दोषी ठरवले. विशेष म्हणजे प्रभुनाथ यांना लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय मानले जाते. 1995 साली आमदार अशोक सिंह यांची हत्या झाली. 1997 साली पाटणा उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे प्रकरण हजारीबाग न्यायालयात वर्ग करण्यात आले. गेल्या 20 वर्षांपासून हजारीबाग कोर्टात या खटल्याची सुनावणी सुरु असून, प्रभुनाथ सिंह हे सध्या हजारीबाग कारागृहातच आहेत.