माजी खासदार कॉ.गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या १० व्या स्मृतीदिनानिमित्त सुभाषिनी अली यांचे व्याख्यान

0

अंबाजोगाई : स्वांतत्र्यसेनानी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्या माजी खासदार सुभाषिनी अली यांचे व्याख्यान “संवैधानिक स्वातंत्र्याचे वर्तमान वास्तव ” या विषयावर ४ ऑक्टोबर रोजी आद्यकवी मुंकुदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात सांय.६ वाजता आयोजित करण्यात आले आहे.

कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे यांनी आपले आयुष्य तत्त्वनिष्ठा,त्याग ,सेवाभाव ही जीवनमुल्य जपत कष्टकरी आणि शोषित मानवाच्या उत्कर्षासाठी घालवली. तोच वारसा जपत कॉ.गंगाधर अप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण देशातील लोकशाही मुल्य जपण्यासाठी विचारांचा जागर व प्रबोधनाची अंबाजोगाई सारख्या सांस्कृतिक नगरीमध्ये जबाबदारी पार पाडत आहे .या अगोदर स्मृती प्रतिष्ठाणच्या व्याख्यानास न्यायमुर्ती बी.एन.देशमुख, न्या.बी. जी.कोळसे पाटील ,पत्रकार पी साईनाथ ,राम पुनियानी ,माजी पुलिस आयुक्त सुरेश खोपडे ,अच्युत गोडबोले ,तिस्ता सेटलवाड ,मुक्ता दाभोळकर, विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी मार्गदर्शन केले आहे. या व्याख्यानास अंबाजोगाईच्या नागरिकांनी उपस्थित रहावे ,असे आवाहन कॉ.गंगाधर अप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.