फैजपूर- दुचाकीस्वार ओव्हरटेकच्या प्रयत्नात चारचाकीवर आदळून झालेल्या अपघातात माजी खासदार डॉ.गुणवंतराव सरोदे हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात आमोदा गावापासून काही अंतरावर शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास झाला. डॉ.सरोदे हे आपल्या चारचाकी इंडिका (एम.एच.19 ए.ई 0998) ने सावद्याकडून भुसावळकडे जात असताना पिंपरूळ फाट्याजवळ दुचाकी (एम.पी.12 एम.आर. 1502) वरील चालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात चारचाकीला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. माजी खासदार डॉ.सरोदे यांना किरकोळ ईजा झाल्याने त्यांच्यावर सावदा येथे उपचार करून घरी पाठवण्यात आले. दुचाकीस्वारावर न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर संध्याकाळी घरी पाठवण्यात आले. जगदीश प्रेमसिंग बारेला यांनी खबर दिल्यावरून फैजपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास कॉन्स्टेबल हेमंत सांगळे करीत आहेत.