माजी खासदार वाय.जी.महाजन कालवश

0

लढवय्या कार्यकर्ता हरपल्याने शोककळा

भुसावळ- माजी खासदार यशवंत गिरधर महाजन उर्फ वाय.जी.महाजन (79) यांचे सोमवार, 29 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगावच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सुरुवातील काही दिवस त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. माजी पंतप्रधान स्व.अटलबिजारी पंतप्रधान असताना महाजन हे खासदार होते शिवाय ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी त्यांनी नशिराबाद येथे शिक्षण संस्थाही काढली होती. भोरगाव लेवा पंचायतीत त्यांचे भरीव योगदान राहिले तर 18 व 19 मार्च 1984
रोजी पाडळसे येथे झालेल्या समाजाच्या अधिवेशनात त्यांनी सक्षमपणे जवाबदारी पेलल्याने त्यांचे कार्याचे कौतुकही झाले होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता नशिराबाद येथून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.