आमदार सुरूपसिंग नाईकांसह शिरीष नाईकांकडून छळाचा आरोप
नंदुरबार- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नवापुरचे आमदार सुरुपसिंग नाईक व त्यांचे सुपुत्र शिरीष नाईक यांच्या छळाला कंटाळून आम्ही काँग्रेस सोडत आहोत आणि भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत, अशी घोषणा माजी खासदार तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गाहीत यांचे सुपूत्र भरत गावीत यांनी नंदुरबार येथे बोलताना केली. गेल्या काही दिवसांपासून भरत गावीत हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. ती आता पूर्ण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत देखील आम्हाला काँग्रेसच्या काही नेत्यांनी वाळीत टाकलं होतं, आमच्यावर अविश्वास दाखवला, त्याची खंत आम्हाला आहे, म्हणून आम्ही भाजपात प्रवेश करणार आहोत, अशी घोषणा भरत गावीत यांनी केली,