नवापूर । नवापूर तालुक्यातील पांगरान येथे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रथम महिला अध्यक्षा स्व हेमलताताई दिलीप वळवी यांच्या 15 व्या पुण्यतिथी निमित्त स्फुर्ती स्थान समाधी स्थळावर पुष्पअर्पण करण्यात येऊन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांची मोठी उपस्थितीत यावेळी होती.
यांची होती उपस्थिती
माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री माणिकराव गावीत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावीत, जिल्हा परिषद सदस्या सौ संगिता गावीत, नाशिक येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अनिल वसावे, निता वसावे, पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, नगराध्यक्षा हेमलता पाटील, गटनेते गिरीष गावीत,आरोग्य सभापती विश्वास बडोगे, नगरसेवक दर्शन प्रताप पाटील, बबीता वसावे, तानाजी वळवी, देवसिंग पाटील,भानुदास चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देसले, कार्तीक अरुणाचलम, माजी नगरसेवक अजय पाटील दिलीप वळवी, प्रा डाँ आय जी पठाण, हेमंत जाधव, भावेश खैरनार, जयवंत जाधव, भगवान गिरासे, दिपक सोनवणे आदींची उपस्थिती होती. स्व.सौ.हेमलता दिलीप वळवी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा पांगराण, स्व.आईसाहेब सुरेखाबाई माणिकराव गावीत अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा कारेघाट तथा माणिकरावजी विद्या प्रसारक संस्था संचलित सुमाणिक प्राथमिक विद्यालय नवापूर येथील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, सुमाणिक गँस एजन्सीचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.