मानमोडीची घटना ; संजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
बोदवड – जिल्हा परीषदेचे माजी सदस्य संजय सखाराम पाटील (52) यांनी गुरुवारी दुपारी आपल्या 1.15 वाजेच्या सुमारास आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संजय सखाराम पाटील यांनी महेंद्र फायनान्स हौसिंग लिमिटेड या कंपनीकडून घर बांधणीसाठी कर्ज घेतले होते. या कर्जाची ते परतफेड करण्यास दिरंगाई करीत होते. महेंद्र फायनान्स कंपनीचे कर्मचारी जप्तीची कारवाई करीत असल्याने त्यांना त्याचे वाईट वाटून जप्तीची कारवाई सुरू असतांना त्यांनी स्वतःच्या राहत्या घरात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरूध्द महेंद्र फायनान्स कंपनीचे कर्मचारी अभिजीत दिलीप देशमुख (इंदिरा नगर, नाशिक) यांच्या फिर्यादीवरुन बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे आदर्शगाव मानमोडीचे माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परीषद सदस्य आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक बी.झेड.जाने करीत आहे.