माजी नगरसेवकाने केला गोळीबार

0

नागपूर । टोळीयुद्ध आणि खंडणी वसूलीतील वर्चस्वासाठी नागपुरात दिवसाढवळ्या गोळीबार व्हायला लागले आहेत. पंकज धोटे या गुंडाने त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीच्या एका गुंडावर गोळीबार केला. सुमित ठाकूर नावाचा हा गुंड सुदैवाने बचावला आहे. पंकज धोटे हा माजी नगरसेवक मामा धोटे यांचा मुलगा आहे. नागपुरातील दिनशॉ चौकात पंकज धोटे हा बाईकवरून आला आणि त्याने सुमित आणि त्याच्या साथीदारांच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्या. पोलीस मात्र त्याने एकच गोळी झाडल्याचं म्हणतायत.

हॉटेलची तोडफोड
गोळीबार केल्यानंतर सुमितला पंकजने शिवीगाळ केली आणि तो ज्या हॉटेलमध्ये बसला होता त्या शंभू कँटीनची पंकज आणि त्याच्या साथीदारांनी तोडफोड केली. घटनास्थळापासून गिट्टीखदान पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेचे कार्यालय केवळ एक कि.मी. अंतरावर आहे.