चाळीसगाव-दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक विद्यमान लोकप्रतिनिधीकडून शुभेच्छापत्रे दिले जातात मात्र या औपचारिकपणाला फाटा देत शहरातील चौधरीवाडा येथील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरींनी आपल्या प्रभागातील नागरिकांना घरोघरी जाऊन सुमारे सव्वाशे किलो मिठाईचे वाटप केले.
हा प्रभाग शहरातील सर्वात गोरगरीब जनतेचा तसेच कष्टकरी श्रमिक नागरिकांचा समावेश असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो. यात हरिओमनगर, चौधरी वाडा, कोळी वाडा, छोटी गुजरी, डोहर वाडा, सुवर्णाताई देशमुख नगर, भीमनगर, मुस्लिम बहुल मोहल्ला यांचा समावेश होतो या परिसरात ही मिठाई चे पाचशे पाकीट वाटप करण्यात आले आहे यावेळी महेंद्र चौधरी, गणेश चौधरी , अमोल गोसावी, आधार चौधरी, हिरामण चौधरी व प्रभाकर चौधरी मित्र मंडळ सदस्य यांनी परिश्रम घेतले या उपक्रमाचे शहरात कौतुक करण्यात येत होते.