माजी नगराध्यक्ष पिता, पुत्रावर गुन्हा दाखल

0

धुळे । पोलिस कारवाईत हस्तक्षेप करीत कर्मचार्‍याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी आणि त्यांचा मुलगा सुमित मिस्तरी यांच्याविरुध्द शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महेश मिस्तरी हे मुलासह स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा महेश मिस्तरी यांनी केला आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी जयदुर्गा मित्रमंडळाच्या मिरवणुकीत शांतता भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमित मिस्तरी याला पकडून शहर पोलिस ठाण्यात आणले होते. महेश मिस्तरी हे पोलिस चौकीत आले. त्यांनी मुलाला का पकडून आणले याचा जाब विचारुन, त्याला सोडण्यास सांगितले. त्याला सोडले नाही तर मिरवणूक पुढे जाऊ देणार नाही. त्याचे परिणाम वाईट होतील, असे धमकावले. महेश मिस्तरी, सुमित मिस्तरी यांनी हूज्जत घालून कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आले.