माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांना पोलीस कोठडी

0

धुळे । घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या आयकर विभागाच्या पथकातील अधिकार्‍यांना मज्जाव करीत शासकीय कामात अडथळा आणला, तसेच पथकातील महिला अधिकार्‍यांच्या विनयभंग केल्या प्रकरणी शिरपूरचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्यासह 400 लोकां विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्याम चव्हाण हे 21 रोजी स्वतः हुन पोलिस स्थानकात हजर झाल्या नंतर शिरपूर कोर्टात चव्हाण यांना हजर केले असता न्या. बी सि मोरे यांनी एक दिवस पोलिस कोठडी सुनावली.