जळगाव । देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 93व्या वाढदिवसानिमित्त भाजपा जळगाव जिल्हा महानगरतर्फे सोमवारी विविध सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते मंडल क्रमांक 1 मध्ये वडाचे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये मंडल अध्यक्ष राजेंद्र मराठे, प्रा.जीवन अत्तरदे, कपिल पाटील, प्रदीप रोटे, धीरज सोनवणे, सुशील हासवाणी, विनोद मराठे, राहुल पाटील, राहुल वाघ यांनी नागरिकांच्या घरी जाऊन व जनतेशी संपर्क करून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती दिली अश्या प्रकारे सुशासन दिनाचे महत्व स्पष्ट केले.
कांताईमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम
कांताई सभागृहात युवा मोर्चातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, गट नेते सुनील माळी, महिला अध्यक्षा जयश्री पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष जितेंद्र मराठे, सुरेश भट, सी.डी.पाटील, आशिष वाणी, लक्ष्मण धनगर, ललिता पाटील, उषा पाठक, ममता जोशी, तेजस जोशी, दत्तात्रय जाधव, अनिल जोशी आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अन्नदान व चादरी वाटप
अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिनी शहरातील जिल्हा रूग्णालयात गरीब बांधवांना अन्नदानाच कार्यक्रम आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले. तर सायंकाळी रेल्वे स्टेशन परीसर, बसस्थानक परीसरात गरजू बांधवांना चादर वाटप करण्यात आले.