भ्रष्टाचार प्रकरणी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सात वर्षांची शिक्षा

0

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना अल- अजीजिया घोटाळाप्रकरणी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्यांना न्यायालयाने 25 मिलीयन डॉलरचा दंड सुद्धा ठोठावला आहे.तर नवाज शरीफ यांना फ्लॅगशिप इन्वेस्टमेंट प्रकरणी पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने निर्दोष केले आहे.

इस्लामाबादमधील भ्रष्टाचारविरोधी न्यायालयात आज फ्लॅगशिप इन्वेस्टमेंट आणि अल- अजीजीया प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश मोहम्मद अरशद मलिक यांनी याप्रकरणावर निर्णय दिला. दरम्यान, नवाज शरीफ आधीपासून भ्रष्टाचार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने नवाज शरीफ यांचे पतंप्रधान पद बरखास्त केले होते.