शिंदखेडा(प्रतिनिधी)– .शहर काँग्रेसतर्फे स्व. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी
करण्यात आली. यानिमित्ताने पाटण चौफूली येथे असलेल्या श्रीजी शोरूममधे आ.कुणाल पाटील,पक्षाचे जिल्हाध्यक्ष . शामकांत सनेर, माजी सभापती सुरेश देसले ,माजी विरोधी पक्षनेते नेते सुनिल चौधरी यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याच वेळी राष्ट्रवादी कॉग्रेस च्या
लिगल सेल चे राज्य कार्यकारीणी सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ॲड.निलेश देसले यांचा आ. पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी नगरसेवक दिपक अहिरे. प स सदस्य ् राजेंद्र देवरे. शहर अध्यक्ष दिनेश माळी.युवक तालुका अध्यक्ष सोनु झालसे,नगरसेवक .सुभाष देसले. हाजी शब्बिर पठाण.गोटू ठाकुर, वेडू माळी. चंद्रशेखर चौधरी,परिक्षीत देशमुख,प्रमोद पवार,सहमद शेख, निमण पठाण,हमीद पठाण,राकेश पवार,तन्वीर मिर्झा,महेश चौधरी उपस्थित होते.