पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत लालबहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.