माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा 

0
भुसावळ : घर पाडल्याप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा राग आल्याने माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारींनी ज्येष्ठ नागरीकाला शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी सकाळी 7 ते 7.30 दरम्यान शहरातील लोणारी हॉलजवळ घडली. याप्रकरणी शहर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस सुत्रांनुसार, शहरातील श्रीनगरातील रहिवासी पुरुषोत्तम खुशाल पाटील (वय 64, मजुरी) यांचे घर अतिक्रमणात असल्याकारणाने ते तोडले. याबाबतची तक्रार पुरुषोत्तम पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे दिली. याचा राग आल्याने आज सकाळी 7 ते 7.30 वाजे दरम्यान माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी लोणारी हॉलजवळ पुरुषोत्तम पाटील यांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. लोणारी यांनी मात्र आरोप फेटाळून लावला.