जळगाव – माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचे मोठे बंधु कै. विश्वनाथ गणपतराव खडसे (वय-75) यांचे 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.30 वा कोथळी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 4 वाजता कोथळी येथील निवासस्थान येथून निघणार आहे. स्व.विश्वनाथ खडसे यांचे शिक्षण मराठवाडा विद्यापीठातून 1968 साली एम.एस्सी. केमिस्ट्री मध्ये झाले ते विद्यापीठातील पाहिले गोल्ड मेडॅलिस्ट होते. त्यानंतर त्यांनी सिबागाई (बिनाका) मुंबई या विदेशी कंपनीत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले. त्यांच्या पश्चात भाऊ, एक बहीण, पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आमदार एकनाथराव खडसे यांचे वडील बंधू तर सचिन व निर्मल खडसे यांचे वडील होत.