माजी मंत्री आ .एकनाथराव खडसे यांनी केली नाडगाव रेल्वे उड्डाणपुलाची पाहणी
मुक्ताईनगर प्रतिनिधी -.…….. मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावर नाडगाव येथे मध्य रेल्वेची रेल्वे क्रॉसिंग आहे
येथे असलेले रेल्वे गेट तासन तास बंद राहते त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो
हि बाब लक्षात घेऊन माजी महसुल मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांने आणि पाठपुराव्यामुळे येथील येथे रेल्वेक्रॉसिंग वर उड्डाण पुल मंजुर करण्यात आला आहे
या उड्डाण पुलाच्या निर्मितीचे काम सुरू आहे
उड्डाणपुल निर्मितीचे कार्य गेल्या चार ते पाच वर्षापासून सूरू असूनसुद्धा उड्डाणपूल निर्मितीची विहित मुदत संपून गेली तरी देखील या उड्डाण पुलाचे काम पुर्ण झाले नाही .
जे काम झाले ते सुद्धा अपूर्ण आणि निकृष्ठ दर्जाचे आहे
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुक्ताईनरचे आमदार चंद्रकांत पाटिल यांनी आंदोलन करत रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करून दिला होता
परंतु पुलाचे काम कंत्रादारांकडून अत्यंत सुमार दर्जाचे करण्यात आले असुन पंधरा दिवसात रस्ता जागोजागी उखडला आहे कोट्यवधी निधी खर्च करुन नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासारखा हा प्रकार आहे
आज माजी महसुल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी या उड्डाण पुलाची पाहणी केली असता पुलाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले असल्याचे आढळून आले पुलावर आणि पोहच रस्त्यावर केलेले डांबरीकरण एका पावसात वाहून गेले असून जागोजागी खड्डे पडले असुन त्याखालील माती उघडी पडली असुन चिखल झाला आहे पुलाचे इतर कामे सुद्धा अपूर्णावस्थेत आहेत यामुळे अपघात होउन मोठी हानी होण्याची संभावना आहे
आ .एकनाथराव खडसे यांनी आज पुलाची पाहणी करून कामाच्या निकृष्ठ दर्जा बाबत सबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून धारेवर धरले तसेच कामाच्या निकृष्ठ दर्जा बाबत चौकशी करण्यात येऊन कंत्राटदारावर कारवाई करण्याची महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आणि नाशिक विभागाचे दक्षता आणि गुणनियंत्रण विभगाचे अधीक्षक अभियंता आणि इतर संबंधितांकडे लेखी मागणी केली आहे
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे,बाजार समिति उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, रामदास पाटील, किशोर गायकवाड, राजेंद्र माळी, भागवत टिकारे विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, भरत अप्पा पाटील , दिपक वाणी,किरण वंजारी , प्रमोद धामोडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नागरिक उपस्थीत होते