माजी मंत्री एकनाथराव खडसेंची मुक्ताईनगरात आंबे तुला

0

संदीप देशमुख यांचा उपक्रम ; खोट्या आरोपातून क्लीनचीटने कार्यकर्त्यांमध्ये समाधान

मुक्ताईनगर- खासदार रक्षा खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरसह मतदारसंघात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खडसे फॉर्म हाऊसवर भाजपचे सरचिटणीस संदीप देशमुख यांच्यातर्फे खडसेंची करण्यात आलेली ‘आंबतुला’ चर्चेचा विषय ठरली. गेल्या दोन वर्षांपासून खडसेंवर पुराव्याविनाच सुरू असलेले आरोप सत्र त्यातच भोसरी जमीन प्रकरणात एसीबीने क्लीनचीट दिल्याने कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी महानंदच्या अध्यक्षा मंदा खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा परीष उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजप संघटण सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, जिल्हा परीषद सदस्य कैलास सरोद, कृउबा समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा बँक संचालक वाडीलाल राठोड, स्वीय सहाय्यक योगेश कोलते, पांडुरंग नाफडे , विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले, सहक्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, भाजप मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, भाजप बोदवड तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, जिल्हा परीषद सदस्य जयपाल बोदडे, सतीश चौधरी, बी.सी.महाजन, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, राजू माळी, ललित महाजन, आसीफ बागवान, सुमीत बर्‍हाटे, अनिकेत पाटील, संजय कपले, डॉ.गजानन खिराडकर, मनोज तळले, अजय महाराज तळले, सचिन पाटील, गणेश कोळी व असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांचे राजे नाथाभाऊ -संदीप देशमुख
कार्यक्रमपप्रसंगी संदीप देशमुख म्हणाले की, दरवर्षी आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचे राजे लोकनेते एकनाथराव खडसे यांची वहीतुला, साखरतुला, पेढे तुला इत्यादी करतो पण सध्या उन्हाळा म्हणजेच फळांचा राजा असलेल्या आंब्यांचा सीजन सुरू असल्याने आम्ही आमचे राजे लोकनेते एकनाथराव खडसे यांची आंबे तुला केली.