जनसंग्राम संघटनेतर्फे रमजाननिमित्त दुवा पठण ; वजूसाठी दिले थंड पाण्याचे जार
निंभोरा : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या बिनबुडाच्या आरोपानंतर त्यांना क्लीनचिट मिळाल्याने पुन्हा त्यांची मंत्री मंडळावर वर्णी लागण्यासाठी जनसंग्राम संघटनेतर्फे दुवा पठण करून प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी वजूसाठी थंड पाण्याचे जारही देण्यात आले.
खडसेंना मिळावी पुन्हा मंत्री पदाची संधी
पवित्र रमजान महिन्याच्या निमित्ताने सर्व रोजदार बांधवांना इफ्तार व त्यापूर्वी वजू वेळी थंड पाण्याचे जार पुरविण्याचा उपक्रम जनसंग्रामच्या वतीने राबविण्यात आला. निंभोरा येथील मस्जिदीमध्ये संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, निंभोरा ग्रा.पं.सदस्य शेख मुजाहिद शेख गुलाब, वाय.डी.पाटील, शेख हसन, गौरव ठाकरे, करीम यासीन मन्यार यांच्यासह सोहिल शेख सांडू, आरीफ सल्लाद्दीन पटेल, बालू शेख अजीज, इरफान बशीर पटेल, शेख सादीक शेख बिस्मिल्ला, सैय्यद मुशीर, राज अकिल खाटीक, शेख फारुख शेख हसन, युसूफ शेख जलाल, रेहान लतीफ मिर आदींनी उपस्थित राहून नमाज पठण केले. माजी मंत्री खडसेंची पुन्हा मंत्री मंडळावर वर्णी लागण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.