मराठा समाजाला आरक्षण देण्यासह पाच प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी
मुक्ताईनगर- मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी जिल्हास्तरावर हॉस्टेलची सुविधा द्यावी, जाहीर केलेल्या 50 टक्के शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अद्यापपर्यंत एकाही विद्यार्थ्याला प्रवेश मिळालेला नाही याबाबत तत्काळ अंमलबजावणी करावी, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत जाहीर केलेली 75 हजार मेगा भरती थांबविण्यात यावी, अण्णासाहेब महामंडळामार्फत बेरोजगारांसाठी घोषीत कर्ज प्रकरणांची अंबलबजावणी करण्यात यावी आदी प्रमुख पाच मागण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे राज्यभरात आंदोलन सुरू आहे तर त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर आमदारांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने सोमवारी मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार तथा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊससमोर ठिय्या आंदोलनाला सकाळी 10 वाजेपासून सुरूवात करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत.